नाशिक – बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी केदा पगार तर उपसरपंच पदी पुंजाराम पगार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उत्राणे गावातील ८ च्या ८ जागा मोठया मताधिक्क्याने निवडून आल्या आहे. आज येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. त्यात सरपंच पदासाठी केदा पगार तर उपसरपंच पदासाठी पुंजाराम पगार यांचेच अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.छगन भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुभाष भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, माजी आमदार दिपिका चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.