सटाणा – बागलाण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच झपाट्याने वाढत आहे सध्या बागलाण मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने हजारी गाठली आहे. तालुक्यात डांगसौंदाणे येथे कोव्हिडं सेंटर असुन नामपुर येथे ही तात्काळ कोव्हिडं सेंटर उभारून रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून बागलाण तालुक्यातील कोरणा परिस्थितीची माहिती दिली आहे. सध्या तालुक्यात हजारच्या आसपास ऍक्टिव्ह रुग्णसंख्या असून कोरोणाने संपूर्ण तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आपला विळखा घातला आहे.याही परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी नामपूर येथे कोव्हिडं केअर सेंटर तात्काळ सुरू करावे व ऑक्सीजन सिलेंडरचा होणारा तुटवडा दूर करावा तालुक्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा गरजेनुसार पाठपुरावा करण्यात यावा. रेमडिसिव्हीरचा होणारा काळाबाजार तात्काळ थांबवून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आजच सर्व वितरकांना सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगत ऑक्सीजन सिलेंडरचा ही पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती दिली आहे. नामुपरचे कोव्हिडं सेंटर हे तात्काळ सुरू करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच सुसज्ज कोव्हिडं केयर सेंटर कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहीती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माजी आमदार संजय चव्हाण यांना दिली आहे. आपण या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही मागणी केली आहे. ना.भुजबळ यांच्या सूचनेनुसार लवकरच नामपूर कोव्हिडं सेंटर येथे ३० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होत असल्याची ही माहिती माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली आहे.