सटाणा – पावसाच्या आगमनामुळे मोसम खो-यातही शुभवार्ता आहे. हरणबारी धरण आज (१२ ऑगस्ट) दुपार नंतर ओव्हरफ्लो झाले आहे. ११६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे धरण गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच भरुन वाहू लागले होते. यंदा मात्र बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने हे धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे मोसम नदी प्रवाहित झाली आहे. या धरणावर मोसम खो-यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना तसेच सिंचनासाठी पाण्याचा उपयोग होतो. तसेच, पुढे या धरणातील पाणी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात पोहचते. हे धरण ओव्हर फ्लो झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.