मुंबई – बांगलादेशी नागरिकांना बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्या-या टोळीचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. त्यात मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात मालेगावच्या एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्याने मालेगावचे आजी व माजी आमदारांच्या लेटरपॅडचा वापर केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकारात एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना मुप्ती आणि कँाग्रेसचे माजी आमदार शेख असिफ शेख रशीद यांच्या लेटरपॅडचा वापर केला असल्याचे समजते. दरम्यान हे लेटरपॅड बनावट आहे का याचा पोलिस तपास करीत आहेत.
मुंबईच्या एजंटला पकडल्यानंतर त्याने हे पासपोर्ट व आधार कार्ड हे मालेगावच्या एजंट कडून बनवून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे हे रॅकेट काय आहे. याचा पोलिस कसून तपास करीत आहे. दरम्यान आमदार मौलाना मुप्ती यांनी आधार कार्डसाठी नागरिकांना पत्र दिले जातात पण त्याची नोंद ठेवली जाते, पासपोर्टसाठी कधी पत्र दिले नसल्याचे सांगितले. माजी आमदार शेख असिफ शेख रशीद यांनी आमदार असतांना आधार कार्डसाठी पत्र दिले जात होते, त्याचे रेकॅार्ड ठेवले गेले आहे. पत्र देतांना त्याचे पुरावे सुध्दा घेतले जाते. पोलिसांच्या तपासाला सहकार्य करु असेही ते म्हणाले.
हे मिळाले बनावट
मुंबई पोलिसांना या प्रकरणात १५५ आधार कार्ड, ३४ पासपोर्ट, २८ पॅन कार्ड, ८ रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, १८७ बँक आणि पोस्टाचे पासबुक, १९ रबर स्टॅम्प आणि २९ शाळा सोडल्याचे दाखले एजंटकडून मिळाले आहे.