नवी दिल्ली – अॅपल कंपनीने सर्वाधिक प्रलंबित आयफोन १२ लॉन्च केला आहे. या सिरीजमधील चार आयफोन कंपनी बाजारात आणणार आहे. आयफोन १२च्या सिरीजमधील दोन स्मार्टफोन बाजारात आणणार असून आयफोन १२ प्रो मध्येही दोन स्मार्टफोन बाजारात आणले जात असल्याचे सांगितले जात आहे.
आयफोन १२ मिनी स्क्रीन अर्थात ५.१ इंच आकाराचा आहे. ज्याची किंमत ६९९ डॉलर अर्थात ५१ हजार पर्यंत असणार आहे. याशिवाय ६.१ इंचाच्या आयफोनची किंमत ७९९ डॉलर अर्थात ५८ हजार ३०० रुपयांपर्यंत असणार आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप दोन्ही रूपांमध्ये उपलब्ध असणार आहे. ६४ जीबी ते २५६ जीबी दरम्यान स्टोरेज क्षमता यात असणार आहे. या मॉडेलचे डिझाईन आयफोन ४ आणि ५ च्या समतुल्य असल्याचे म्हटले जात आहे.
मागील वर्षाप्रमाणेच आयफोन १२ मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा असेल तर उच्च श्रेणीतील ट्रिपल रीअर सेन्सर यात समाविष्ट असणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित आयफोन १२च्या चर्चा रंगतांना दिसत आहेत.