पिंपळगाव बसवंत – बहुजन रयत परिषदेच्या नाशिक जिल्हा सल्लागार पदी चंद्रभान साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. चांदवड तालुकाध्यक्षपदी सुरेश आरणे, तर मालेगाव तालुकाध्यक्षपदी कैलास वाकळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. परिषदेची बैठक मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथे झाली. त्यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बहुजन रयत परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव शृंगार, राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष संजय शिरसाट, जिल्हाउपाध्यक्ष गजानन पगारे, सोशल मिडीया प्रमुख किशोर साळवे, निफाड तालुका संघटक शंकर बंदरे, चांदवड तालुका युवक अध्यक्ष महेश बत्तीसे, केदू शिरसाट, अंबादास जाधव, असलम काद्री, मनोहर शिंदे, योगेश बत्तीसे, योगेश धाकराव, सोमनाथ शिंदे, हिरामण श्रावण वाकळे, जनार्दन उत्तम पानपाटील, नाना गोरख पगारे, सुजित श्रीराम वाकळे, हरी जनार्दन पानपाटील, प्रकाश दादाजी पानपाटील, सूरज कैलास वाकळे, राकेश कैलास वाकळे, धनंजय पगारे, अमोल जनार्दन पानपाटील आदी पदाकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.