नाशिक – बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व कोंबडीजन्य पदार्थांच्या आवक संदर्भात काढलेल्या आदेशाचे सर्वांनी व्यवस्थित वाचन करावे. हे आदेश ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आधीच झालेला आहे तेथून नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतेही कोंबडी अथवा कोंबडी जन्य पदार्थ आणण्यावर बंदी घालणारे आहेत. आपल्या जिल्ह्यात अद्याप कोणताही संसर्ग झालेला नसल्याने आपल्या जिल्ह्यातून कोंबडी व कोंबडी जन्य पदार्थ बाहेर पाठवण्यावर कोणतीही बंदी नाही. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये कोंबडी चिकन यांचे खाद्यपदार्थ म्हणून वापर करण्यावर सुद्धा कोणतेही निर्बंध नाहीत याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.