नाशिक – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद आहेत. श्रावण महिना सुरू झाला तरी भाविकांना त्र्यंबकराज्याचे दर्शन दुर्लभ होत आहे. ही बाब ओळखून त्र्यंबकेश्वर देवस्थानने त्र्यंबकेश्वराचे दर्शन ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (१० ऑगस्ट) ही सुविधा कार्यन्वित करण्यात आली आहे. www.trimbakeshwartrust.com या वेबसाईटवर हे दर्शन उपलब्ध होणार आहे. तशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत हे दर्शन मिळू शकणार आहे.