मुंबई – ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात रविंद्र जडेजा याला डोक्यावर जखम झाल्यामुळे त्याच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून आलेला यजुवेन्द्र चहल याने हा सन्मान मिळवला. त्यामुळेच तो बदली खेळाडू म्हणून आला आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला. भारतीय टीमने ११ धावांनी विजय संपादन केला. या विजयानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कॅनबेरा येथे झालेल्या या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा सलामीवीर के.एल.राहुल याने झळकावलेले अर्धशतक आणि रवींद्र जडेजा याने ठोकलेल्या ४४ धावांच्या जोरावर भारताने २० ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून १६१ धावांचा स्कोर उभा केला. ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित २० ओव्हर्स मध्ये सात विकेट्स गमावून केवळ १५० धावा करू शकला.
१२व्या खेळाडूला मिळाला मॅन ऑफ दि मॅच
जडेजाच्या जागी १२वा खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने चार ओव्हर्समध्ये केवळ २५ धावा देत तीन महत्त्वाचे बळी प्राप्त केले. चहलने सामन्याची दिशाच बद्डली आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली. आठव्या ओव्हर च्या पहिल्या चेंडूवर चहल ने ३५ धावा करून क्रीजवर सेट झालेल्या फिंचला हार्दिक पंड्या च्या हातून झेलबाद करवले. यानंतर नवव्या ओव्हर च्या पाचव्या चेंडूला १२ धावांवर खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथ याला संजू सॅमसन च्या हाती झेल देण्यास भाग पाडले. आपल्या चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चहलने मोइजेज होनरिकेजला LBW करून परत पाठवले.