नवी दिल्ली – कधी थंडी, कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामान आणि मध्येच थोडा पाऊस अशा वातावरणात सर्दी, ताप यासारखे आजार वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण अलिकडे कोरोना संसर्ग देखील पुन्हा वाढत आहे. म्हणून कोणत्याही प्रकारे आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, हे पाहाणे गरजेचे आहे.
विशेषतः गर्भवती महिलांनी देखील कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबद्दल त्यांना माहिती हवी…
थंडगार पदार्थ खाण्यास टाळा
बदलत्या हवामानात काही वेळा सौम्य उबदारपणा जाणवू लागला आहे. यामुळे कपड्यांसह जीवनशैलीतही बदल होत आहे. गर्भवती महिलांनी देखील या हंगामात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही वेळा पहाटे व सकाळी थंडी जाणवते, थंडी त्रास होऊ नये, यासाठी थंडगार पदार्थ खाण्याचे टाळा. पाण्यापासून ते फळांच्या रसापर्यंत, तसेच भाजीपाल्याच्या रसात सामान्य तापमान असावे. गर्भवती महिलांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
वारंवार योग्य प्रमाणात पाणी प्या
गर्भवतीच्या शरीरात या काळात बरेच बदल होतात, ज्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला जाणे आवश्यक असते, वारंवार योग्य प्रमाणात पाणी प्यावे, कारण कमी पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर आणि त्वचेवर दिसून येतो.
तेलकट, जंक फूड, साखर टाळा
या दिवसात गर्भवती माहिलांनी आहारामध्ये तेलकट, जंक फूड आणि साखर वगळता सर्व काही खाऊ शकता. उपवास करणे टाळा, आणि योग्य आणि सकस आहार घ्यावा.
सैलसर कपडे घालावेत
गर्भवती महिलांनी आपल्या ड्रेसची काळजी घेतली पाहिजे. घट्ट कपडे, जीन्स, जाड लेगिंन घालणे टाळले पाहिजे. मॅक्सी ड्रेससारख्या लाइटवेट फॅब्रिकसह आरामदायक फॅब्रिक घालावेत.
पादत्राणे
गरोदरपणात उंच टाचाच्या चपला, सँडल, बुट घालणे टाळा, कारण त्यामुळे पायात सूज येणे, कंबरदुखी, मानदुखी आणि डोकेदुखी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आरामदायक पादत्राणे घालावेत.
खुल्या आणि हवेशीर ठिकाणी रहा
आपण जिथे बर्याच वेळेस राहता ती खोली मोकळी आणि हवेशीर असावी. खोलीत अंधार, आवाज, अस्वस्थता ही समस्या असू नये, घरात फुलांच्या कुंडया, शोभीवंत झाडे देखील ठेवा, जेणेकरुन वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहील.