नाशिक – दिवसाच्या प्रहराप्रमाणे गाण्यांची मेजवानी मिळाली तर. हो हे शक्य झाले आहे. रसिकांसाठी अनोखी पर्वणी सध्या मिळत आहे.
लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळा येवू नये यासाठी नेटीझन्समार्फत अनोखी कल्पना समोर आली आहे. याद्वारे दिवसाच्या प्रहराप्रमाणे भारतीय कलावंतांच्या आवाजातील शास्त्रीय गायन समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे तालवाद्य, बासरी अशा सर्वप्रकारच्या वाद्यांची मेजवानी रसिकांना अनुभवता येते आहे.
राग्य या वेबसाईतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे सर्वत्र नैराश्य पसरले होते. अशा वातावरणात संगीताच्या मदतीने साकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न राग्य टीमतर्फे करण्यात आला आहे. सध्या सोशल मिडीयावर यास भरघोस प्रतिसाद मिळतांना दिसतो आहे.
खालील लिंकवर क्लिक करा आणि अभिजात संगीताचा आस्वाद घ्या