नाशिक – जलसंपदा राज्यमंत्री बच्चा कडू यांच्या भावना रास्त आहेत, त्याची दखल आम्ही घेतली आहे, त्याबाबत चौकशी केली जाईल, त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधीतांकडे विचारणा केली जाईल, त्याबाबत कारवाई होईल, त्याबाबत निश्चित रहावे,असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बच्चू कडूंना आश्वासन दिले आहे.
कडू यांनी अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकरी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी पिकांवर कीड आली आहे, अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी माहिती घेऊन पंचनामे करण्यासाठी बांधावर हवे होते, प्रारंभी उगवणीची समस्या होती, त्यानंतर कीडरोगांचा त्रास आहे. याबाबत शेतकरी वर्गात जनजागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यांवर यावरून जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करीत कृषी विभागावर ताशेरे ओढले होते. यासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या सुचनांची दखल घेतली आहे. त्यांची चौकशी होईल,असे सांगितले.