नवी दिल्ली – अनेक बँकां बचत खात्यावर सामान्यत: कमी व्याज दर देत असताना काही छोट्या आणि नवीन खासगी बँका मोठ्या बँकांच्या तुलनेत बचत खात्यावर अधिक चांगला व्याज दर देत आहेत. नवीन खासगी बंधन बँक सध्या ७.१५ टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहेत.
आरबीएल बँक, इंडसइंड बँक आणि आयडीएफसी बँक बचत बँक खात्यावर ६.५ टक्क्यांपेक्षा व्याज दर देत आहेत. तसेच स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यावरही जास्त व्याज दर देत आहेत. एयू स्मॉल फायनान्स बँक ७ टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे तर उज्जिवान स्मॉल फायनान्स बँक ५.५ टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. प्रमुख खासगी आणि सार्वजनिक बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका बचत खात्यावर अधिक व्याज दर देत आहेत.
१) एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक बचत खात्यावर ३ ते ३.५ टक्के व्याज दर देत आहेत. अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक ४ टक्क्यांपर्यंतचा व्याज दर देत आहेत.
२) एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा आदि प्रमुख बँक बचत खात्यावर २.७० टक्के आणि २.७५ टक्के व्याज दर देत आहेत.
३) बंधन बँक ३ ते ७.१५ टक्के व्याज दर देत आहे. येथे किमान शिल्लक मर्यादा ५००० रुपये आहे.
४) आरबीएल बँक ४.७५ ते ६.५० टक्के व्याज दर देत आहे. येथे किमान शिल्लक मर्यादा ५०० ते २५०० रुपये आहे.
५) इंडसइंड बँक ४ ते ६ टक्के व्याज दर देत आहे. इथली किमान शिल्लक मर्यादा १५०० ते १०००० रुपये आहे.
६)आयडीएफसी फर्स्ट बँक ३.५.ते ६ टक्के व्याज दर देत आहे. येथे किमान शिल्लक मर्यादा १०००० रुपये आहे.
७) येस बँक ४ ते ५.५ टक्के व्याज दर देत आहे. येथे किमान शिल्लक मर्यादा २५०० ते १०००० रुपये आहे.