नवी दिल्ली – केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पीएफ व्याजावर कर लावल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले मात्र देशातील काही श्रीमंत लोक पीएफ खाती कोट्यवधी रुपयांचा कर वाचवण्यासाठी वापरत होते. सरकारने नुकतीच काही खात्यांची तपासणी केली असून त्यात एका व्यक्तीच्या खात्यात १०३ कोटी रुपये असल्याचे उघड झाले आहे. त्याचवेळी काही खात्यांमध्ये ८० कोटींपेक्षा जास्त रुपये मिळाले.
हाय नेटवर्थ व्यक्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीतील सर्वात मोठ्या ठेवीधारकांपैकी एकाच्या पीएफ खात्यात १०३ कोटी रुपये सापडले आणि त्यानंतर अशा प्रकारे दोन लोकांच्या खात्यात प्रत्येकी ८६ कोटी रुपये जमा झाले होते. महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार काही श्रीमंत व्यक्तींची माहिती पुढे आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी ठरलेल्या रकमेपेक्षा पीएफ खात्यात जास्त पैसे गेले तर त्यावर कर आकारला जाईल. पीएफ खात्यावर कर नियंत्रण सरकारचे उद्दीष्ट होते. उच्च अधिकारी वर्गाच्या पीएफ खात्यांमध्ये एकूण २० खात्यात एकूण २५ कोटी रुपये आहेत, तर सुमारे १०० श्रीमंतांच्या बाबतीत २० हजार कोटींपेक्षा जास्त पीएफ खात्यात जमा केले जाते. या मदतीने ते करांची बचत करीत आहेत आणि निश्चित परतावा देखील मिळवित आहेत.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, जर एखाद्या कर्मचार्याने पीएफ फंडामध्ये वर्षाकाठी अडीच लाखाहून अधिक रक्कम जमा केली तर त्यावरील व्याजावर कर आकारला जाईल.