पुणे – एक कुटुंब हॉलिडे पॅकेज कंपनीकडून मिळणाऱ्या सेवेबाबत तक्रार करण्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे आले होते. त्यांना सदर पॅकेज रद्द करण्यासाठी एक वर्षापूर्वी पत्र देऊनही त्यांचे पैसे परत मिळत नसल्याची ही तक्रार होती. यासंदर्भात ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सागर यांनी दिलेली माहिती अशी
ग्राहकाला असे फसवले जाते
आपणास एखाद्या टाईम शेअर हॉलिडे पॅकेजचे लोकांचा फोन येतो की आपल्याला बक्षीस लागले आहे आणि त्यात आपण आपल्या जोडीदाराबरोबर यावे असा आग्रह केला जातो. वास्तविक आपणास कोणतेही बक्षीस लागलेले नसते तर आपला डाटा सदर कंपनी ने मिळवलेला असतो आणि आपण पैसे खर्च करतो याचा अंदाज बांधून आपणास आपल्या जोडीदार बरोबर एखाद्या चागल्या जागी, हॉटेल मध्ये बोलावले जाते तिथे आपणास पुढील २५ वर्षे दर वर्षी ठराविक दिवस भारतात तसेच परदेशात सुट्टी घालवणेसाठी रिसॉर्ट मिळेल असे रंगवून सांगितले जाते आणि आपणास एकदा पैसे भरले की पुढे पैसे भरायची गरज नाही असे सांगितले जाते. आपल्याकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे पैसे घेतले जातात किंवा चेक बुक द्वारे पैसे घेतले जातात. ग्राहक त्या सर्व सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन agreement/करारनामा वर सह्या करतो शिवाय पोस्ट dated चेक किंवा डेबिट कार्ड चे ECS देऊन टाकतो.
पुढे ग्राहकास हवे तेव्हा सदर हील स्टेशन किंवा हॉलिडे स्टेशन मधील रिसॉर्ट मिळत नाहीत. कित्येक वेळेस बऱ्याच तडजोडी करून सुधा सुट्टी घालवणे साठी कुठेही जागा मिळत नाही. शिवाय दर वर्षी आपणास मेंटेनन्स पोटी काही हजार रुपये द्यावे लागतात ते वेगळेच. तीन ते पाच लाख रुपये आगावू देऊन आपली फसवणूक झालेली आहे हे ग्राहकास काही दिवसांनी समजते. त्यानंतर आपले गेलेले पैसे परत मिळवणे साठी तो बऱ्याच वेळेला सदर कंपनी मधे फोन करतो, चकरा मरतो, मेल करतो, पत्रे लिहितो पण काहीही उपयोग होत नाही. त्याचे पैसे परत मिळत नाहीत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत याबाबत मोफत मार्गदर्शन करते आणि अशा कंपनी फक्त ग्राहक कोर्टाने दणका दिल्यावरच आपले पैसे परत करतात.
आपलीही फसवणूक झाली असेल तर मोफत मार्गदर्शनासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे मागर्गदर्शन दर सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी
विजय सागर (मो. 9422502315)
अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड,, गोळे कॉम्प्लेक्स,फडतरे चौक, पुणे ४११०३०
मार्गदर्शक:
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
किशोर कुलकर्णी
8308325295
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
श्रीमती किशोरी रावळ, हडपसर
83909 02773