मोहाली (पंजाब) – येथे एका भरधाव कारचालकाने रस्त्याने जाणाऱ्या एका सायकलस्वाराला उडवले. हा अपघात एवढा जबरदस्त होता की सायकलस्वार उडाल्यानंतर थेट कारच्या टपावर पडला. त्यानंतरही कारचालकाने बेदरकारपणे तब्बल १० किलोमीटर पर्यंत कार चालवली. म्हणजेच, सायकलस्वार कारच्या टपावर असतानाही त्याने १० किमी अंतर कापले. त्यानंतर मात्र हे स्पष्ट झाले की सायकलस्वाराचा कारच्या टपावरच मृत्यू झाला होता. त्याला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता. हा सारा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलिस याचा कसून तपास करीत आहेत. कारचालकाचा शोध सुरू आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/manaman_chhina/status/1362410576257949700