मुंबई – चित्रपट अभिनेता राहुल रॉय नुकताच मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला आहे. राहुलला काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर त्यांना लगेच मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. येथे त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया केली गेली. ज्या वेळी राहुलला ब्रेन स्ट्रोक झाला तेव्हा तो कारगिल येथे ‘एल.ए.सी. – लाइव्ह द बॅटल’ या चित्रपटाची शुटींग करत होता. ब्रेन स्ट्रोक नंतर सर्वप्रथम त्याला श्रीनगर येथे आणले गेले आणि तिथून मुंबईला पोचवले गेले. आता नानावटी हॉस्पिटल मधूनसुद्धा बाहेर निघून राहुल वॉक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पोचला आहे.
प्राप्त माहितीनुसार राहुलची तब्येत पूर्वीपेक्षा बरीच उत्तम आहे. त्याची स्पीच थेरपी सुद्धा सुरु आहे. राहुल स्वतःसुद्धा आपल्या इन्स्टाग्रामवर आपली छायाचित्रे शेअर करताना दिसतो आहे. यात राहुल बऱ्यापैकी रोड झालेला दिसत आहे. सध्या ५२ वर्षाचा असलेला राहुल रॉय या वयात सुद्धा खूप स्मार्ट आणि फिट दिसत असे. नवीन छायाचित्रांमध्ये मात्र तो अतिशय थकल्यासारखा दिसतो आहे. इतक्या मोठ्या सर्जरीनंतर हे बदल होणे सहाजिक आहे.
याशिवाय राहुलने नुकताच आपला एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यात त्याला स्पष्ट बोलता येत नाही असे दिसते आहे. मात्र लक्ष देऊन पाहिल्यास त्याचा फक्त आवाज कमी असून बोलणे स्पष्ट असल्याचे लक्षात येते. डॉक्टरांच्या मते ब्रेन स्ट्रोक नंतर राहुलच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. या स्थितीला एफेसिया असे म्हटले जाते.
दरम्यान, राहुल रॉयचा नातेवाईकांनी त्याला झालेल्या ब्रेन स्ट्रोक साठी एका घटनेला जबाबदार धरले आहे. राहुलचे मेहुणे रोमीर सेन यांनी सांगितले की कारगिलमाधिल वास्तव्यादरम्यान एका बाबतीत खूप बेपर्वाई झाल्यामुळे राहुलला ब्रेन स्ट्रोक झाला. या घटनेबद्दल लवकरच कुटुंबीय आणि स्वतः राहुल रॉय खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बघा व्हिडिओ