नाशिक – नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा सण म्हणून ओळखला जातो. या सणांमध्ये आपण दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. या नऊ देवींच्या रूपांची वैशिष्ट्य आणि मल्लखांब खेळ आणि या खेळामुळे होणारे फायदे याची सांगड घालण्याचा प्रयत्न यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
यशवंत व्यायाम शाळा मल्लखांब विभागाचे प्रशिक्षक यशवंत जाधव, उत्तरा खानापुरे, तनया गायधनी, पंकज कडलग, ऋषिकेश ठाकूर अक्षय खानापुरे यांच्या संकल्पनेतून व नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने व्यायामाचे आणि खेळाचे महत्त्व याची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी नवरात्राच्या नऊ दिवसाचे महत्व असलेल्या वेषामध्ये यशवंत व्यायाम शाळेच्या मलखांबपटू आणि प्रशिक्षक यांनी आसनाच्या द्वारे याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.
बघा हे फोटो