नवी दिल्ली – प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याविषयी आपण नकारात्मकच बोलतो. पण, प्रदूषणामुळे आणखी एक वेगळी घटना घडली आहे. अत्याधुनिक कार बनवणाऱ्या टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. त्यांनी बिल गेट्स यांनाही मागे टाकले असून ते आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहेत.
कार बनविणाऱ्या अनेक कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान विकासित करून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहेत. कारण सध्या वायू प्रदूषण ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. जगातील सर्वात मोठी कार बनणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेस्ला कंपनीची प्रमुख भूमिका प्रदूषण कमी करणे अशी आहे, असे या कंपनीने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळेच या कंपनीने टेस्ला इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या कारला जगातील अनेक देशात मागणी असून सहाजिकच कंपनीच्या उद्योग व्यवसायाचा विस्तार होत आहे. याच कारणाने कंपनीचे सीईओ एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत.
सध्या तरी एलन मस्क यांच्या संपत्तीची तुलना करता भारतातील कुणीही श्रीमंत त्यांची बरोबरी करू शकत नाही. भारताच्या बड्या श्रीमंताच्या यादीतील शीर्षस्थानी असलेले मुकेश अंबानी ग्रुप आणि अदानी ग्रुपची या कंपनीचे बाजारपेठ मूल्य हे टेस्लाच्या बाजार मुल्यापेक्षा (मार्केट व्हॅल्यू ) कमी आहे.
ब्लुमबर्ग बिलियनर्स इंडेक्स नुसार, मस्क यांची संपत्ती १२८ अब्ज डॉलर म्हणजेच ९.४७ लाख कोटी रुपये एवढी आहे. तर, पहिल्या क्रमांकावर अॅमेझॉनचे जेफ बेजोस हे आहेत. त्यांची संपत्ती १८२ अब्ज डॉलर (१३.४७ लाख कोटी रुपये) एवढी आहे.
भविष्याचा विचार करताना पर्यावरण रक्षणासाठी आणि वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेल कार पेक्षा इलेक्ट्रिक कारलाच मागणी असणार आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीने इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जगातील अनेक देशांप्रमाणेच दिल्लीसह भारतातीलअनेक शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या बिकट होत आहे. विशेषत: कार्बन मॉनोआक्साइड, नाइट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन यांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आङे. जगातील या संकटाचा मुकाबला करण्यासाठी टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सची संकल्पना संपूर्ण मानवासाठी आशेचा किरण ठरली आहे.