नाशिक – रामकुंड परिसरात सध्या नाशिक स्मार्ट सिटीच्यावतीने विकास कामे केली जात आहेत. भूमीगत गटार योजनेचे काम करतानाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. रामकुंड परिसरात भूमीगत गटारीसाठी खड्डा खोदण्यात आला आहे. जलस्त्रोतामुळे खड्डा अनेक महिन्यांपासून पाण्यातच आहे. मात्र, याच पाण्यात चक्क रेडी मिक्स काँक्रीट ओतले जात असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक रहिवासी देवांग जानी यांनी याचा व्हिडिओ काढला असून त्यातून हे स्पष्ट होत आहे.
बघा व्हिडिओ