नाशिक – नाशिक शहर हे आल्हाददायक हवामान आणि अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं आहे, हे आपण वारंवार ऐकतो. पण, त्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर काही घटना घडाव्या लागतात. लॉकडाऊनच्या काळात सारे काही ठप्प झाले होते. त्यामुळेच पक्षी व प्राण्यांना जणू मोकळे आकाशच मिळाले होते. याच काळात गंगापूररोडवरील डी के नगर परिसरात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पक्षीवैभव दृष्टीस पडलं आहे. एबीबी कंपनीचे उपाध्यक्ष आणि निसर्गप्रेमी गणेश कोठावदे यांनी पक्ष्यांची काही छायाचित्र घरातूनच टिपली आहेत. ती पाहून नाशिकविषयीचा अभिमान नक्कीच वाटतो.
नक्की पहा ही छायाचित्र श्री कोठावदे यांच्या सौजन्याने…
So beautiful clicks ????????????????????