मुंबई – कुवेतहून भारतात तेल आणणाऱ्या श्रीलंकेच्या एमटी न्यू डायमंड या जहाजाला लागलेली आग भारतीय नौदलाच्या आयएनएस सह्याद्री या जहाजाने विझविली आहे. श्रीलंकेपासून ७० किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात असलेल्या या जहाजाला आग लागल्याची माहिती नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने आयएनएस सह्याद्री हे जहाज मदतीसाठी पाठविण्यात आले. आयएनएस सह्याद्रीने पाण्याचा मारा तसेच अन्य उपाय करुन या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. तसेच, आयएनएसचे कमांडर यांनी या जहाजाची आणि आगीच्या कारणाची चौकशी सुरू केली आहे. जहाजावरील २२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एका जणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओ सौजन्य – भारतीय नौदल