नाशिक – वाढदिवसानिमित्त केक कापणे, आई-वडिलांकडून गिफ्ट प्राप्त करणे या परंपरेला छेद देत जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येने मोठा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला गती देणारी ही भेट विशेष चर्चेची ठरली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची कन्या अस्मिता हिचा सोमवारी (५ ऑक्टोबर) वाढदिवस आहे. सध्याचे कोरोना संकट पाहता आदिती हिने एक चांगला निर्णय घेतला. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच आदिती अस्मिता हिने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ टॅब्लेट आणि ९ पेन ड्राईव्ह वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिले आहेत. कु.अस्मिता या आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेकडे जिल्हाधिकारी मांढरे यांनी ही भेट सुपूर्द केली. यानिमित्त बनसोड यांनी अस्मिता आणि जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
अश्या सकारात्मक बातम्या वाचल्या कि समाधान होते