नाशिक – जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे आढळून येत आहे. रुग्णवाढीच्या ४५ टक्के संख्या ग्रामीण भागातील असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने सिन्नर, सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र, भगूर, इगतपुरी, घोटी, पिंपळगाव बसवंत, ओझर, मनमाड आणि नांदगाव यांचा समावेश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनलॉकमुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात उद्योगधंदे मार्गी लागत आहेत. अशातच वाढत्या वर्दळीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील लोक व्यवसायासाठी किंवा कामासाठी शहरी भागात येत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असतो. अर्थचक्रास गती देण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणे शक्य नसल्याचे नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम सध्या सुरू असून, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, नियमित मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत. तपासणीचे प्रमाण वाढवत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यातील सद्यस्थिती
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७६ हजार ९८४ झाली आहे. ६७ हजार १९२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ४०१ जण उपचार घेत आहेत.
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २० हजार ५९३. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ८९४. एकूण मृत्यू – ४६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार २३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.१८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी