मुंबई – उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटरवर अतिशय सक्रीय असतात. त्यामुळेच त्यांचे चाहते भरपूर आहेत. शिवाय ते अनेक लक्षणीय बाबी ट्विट करुन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. आताही त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. त्यात सर्वसामान्यांची कोरोनामुळे झालेली स्थिती दर्शविली आहे. म्हणूनच हे व्यंगचित्र अतिशय लोकप्रिय ठरले आहे.
कोरोनाबरोबरच सर्वसामान्यांना शाळेची फी, डिप्रेशन, अर्थव्यवस्था, भविष्य, आई-वडिलांचे आरोग्य, रोजगार, घराच्या कर्जाचे हफ्ते यांनी सर्वसामान्य व्यक्तीला घेरले आहे. हीच सर्वसामान्य व्यक्ती सध्या बॅटिंग करते आहे. तर, कोरोना गोलंदाजी करीत आहे. या सर्व खेळात भगवंत हा अम्पायर आहे. तर, सर्वसामान्य व्यक्तीचे कुटुंब हे त्या व्यक्तीच्या जोडीला खेळते आहे. असे या व्यंगचित्रात दर्शविण्यात आले आहे.
विविध आव्हानांनी कसे सर्वसामान्यांना घेरले आहे, हे दर्शविणारे हे चित्र आपणही नक्की बघा
No comment necessary. pic.twitter.com/hEC8pb9mVO
— anand mahindra (@anandmahindra) March 17, 2021