कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सध्या सुरू आहे. दुर्गम आणि आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक अडचणी आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उमराणीच्या काल्लेखेतपाड्यावर सध्या असे धम्माल शिक्षण सुरू आहे. त्याचा वेध घेणारा हा लेख….
काल्लेखेतपाड्याची ‘बयडी’वाली शाळा
होय, शाळा बंद आहेत पण…. शिक्षण नक्कीच चालू आहे..!!
नेट, मोबाईल, कॉम्प्युटर, विजेची सुविधा, रस्त्याची सुविधा नसलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उमराणीच्या काल्लेखेतपाड्यावर..!! मागील मार्च पासून संपूर्ण देश कोविड-१९ च्या महामारीच्या विळख्यात अडकून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्र म्हणजे मुलांची रोजची वर्दळ, किलबिल, गलागलाट, अभ्यास, नाविण्य, आविष्कार..! पण सध्या सारं काही स्तब्ध असताना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या काल्लेखेतपाड्याच्या डोंगरात मात्र रोज गुरे राखण्यासाठी जाणारी शाळेची मुलं गुरे जंगलात सोडून एका बिनभिंतीच्या, डोंगरदऱ्यात, नदी नाल्यात भरलेल्या शाळेत मात्र मनसोक्त शिक्षणाचा आनंद लुटत आहेत..!!
कारण शिक्षक आपल्या दरी उपक्रमा अंतर्गत शिक्षक मुलांना आँफलाईन पद्धतीने शिकवत आहेत. पण काही पालकांचे मुल नेहमी गुरे चालायला डोंगरावर सकाळी ७ ला जायचे व संध्याकाळी परत यायची ही आडचण लक्ष्यात घेऊन शाळेतील शिक्षकांनी मुले ज्या ठिकाणी गुरे राखात असतात तेथेच जाऊन शाळा भरवायला सुरूवात केली.
ऊबंटू चित्रपटासारख्या एका कथेला शोभणारे ही मुलं आणि त्यांना खिळवाया लावणारे त्यांचे शिक्षक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे हे नक्कीच भविष्य घडविणारे गुरुवर्य..! शाळेला सुट्टी असल्याने पाड्यावरील मुलं रोज गुरे राखण्यासाठी जंगलात जातात… त्याला स्थानिक आदिवासी पावरी बोलीभाषेत बयडी म्हणतात… बयडी म्हणजे गावातील सर्व गुरे एका ठिकाणी जंगलात सोडून देतात ती जागा!!!!
पण एके दिवशी अचानक शाळेचे गुरूजी बयडीला हजर होतात.. सोबत गुंडाळी फळा, सॅनिटायझर, मास्क, खडू…!! आणि भरायला लागतो बिनभिंतीची मनसोक्त शाळा….
दिवसागणिक दिवस त्या शांत हिरवाईने नटलेल्या डोंगरांना शिक्षणाची चौदाखडी ऐकवीशी वाटू लागते..! रोज २ ते ३ तास मुलांसोबत शिक्षक वेळ देऊन हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण दिले जात आहे..!
पहिल्या दिवशी चार मुले असणाऱ्या बायडीच्या शाळेत गुरुजी रोज येतात समजल्यावर दोनच दिवसात २० पर्यंत मुले हजर होऊ लागतात..!
मग सुरू होतो आग्गोबाई ढग्गोबाई, डॉ. कलामांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजीची वर्ड ट्रेन, गणितीय आकडेमोड, सोबत प्रत्यक्ष निसर्गातून भूगोल…!!
या शाळेतील मुलांना पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून पाड्यावरील अशिक्षित परंतु शिक्षणाचे महत्व माहित असलेले कोटा शामसिंग पावरा यांनी अभ्यास कुटिया बांधून देत आहेत…!! यास शाळेतील मुख्याध्यापक रुपेशकुमार नागालगावे व इतर शिक्षक तेगा पावरा, दशरथ पावरा आणि लक्ष्मीपुत्र उप्पीन हे वेळोवेळी येऊन या शाळेत सहभागी होतात…!!!!
आहे की नाही भन्नाट काल्लेखेतपाड्याची ‘बयडी’वाली शाळा…!!
मित्रांनो, हे सारे प्रयत्न आहेत फक्त मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणूनच…!! शाळा बंद आहेत… पण शिक्षण घरोघरी, दारोदारी , नदी नाल्यात, दऱ्या डोंगरात नक्कीच चालू आहे…! पण इथे ऑनलाईन शिक्षणाला शून्य किंमत आहे..!! हे मुद्दामच उल्लेख करावासा वाटतो…!!
शेवटी एवढचं म्हणावंस वाटतं…
नदी, दरी खोऱ्यात नाद घुमू दे ||
घरोघरी शिक्षणाचे तार छेडू दे||
शब्दांकन – लक्ष्मीपुत्र उप्पीन (शिक्षक, काल्लेखेतपाडा)
धन्यवाद सरजी
एकदम सुंदर शाळा
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टीम राबवत असलेला उपक्रम अभिनंदनीय आहे.
सर्व टीम चे अभिनंदन
खूप छान सर, बयडी वरची शाळेची मज्जा च न्यारी असते
खूपच छान, तुम्हा सर्व कल्लेखेत टीमला शुभेच्छा
????????????????
Great Going Kalikhetpada. Great efforts by teachers , parents and the community.
I am sure, these children will be great, successful and responsible citizens of India.
Great work
तुम्ही दोघे जिथे आहात तिथे धमाल शाळेची कमाल तर होणारच ????????
खूप छान उपक्रम राबविण्यात येत आहे . विध्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळत आहे .
छान उपक्रम चालवला आहे गुरुजी…शहरी शाळांना पण लाजवेल असा..
हाडाचे शिक्षक… नागलगावे सर आपले काम अतिशय प्रेरणादायी आहे
नागलगावे सर, आपले काम आमच्यासाठी खूप स्तुत्य उपक्रप व प्रेरणादायी आहे .भविष्यात याचा मुलांना खूप उपयोग होईल .