लंडन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जगभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान हवाई वाहतूक आणि सार्वजनिक वाहनांना बंदी घालण्यात आली. युरोपमध्येही असेच घडले, लॅाकडाऊनमुळे हजारो लोक इतर देशांमध्ये अडकले होते. लॉकडाऊन दरम्यान, दहा वर्षांचा रोमिओ कॉक्स आपल्या वडिलांबरोबर आजीच्या भेटीसाठी निघाला. रोमियोने वडिलांसोबत २८०० किलोमीटरचा प्रवास त्याने केला. यावेळी रोमियो इटलीहून ब्रिटनला गेला. अनोख्या भेटीची ही कहाणी सोशल मीडियावर सध्या चांगलीच गाजते आहे.
रोमियोने २० जून रोजी प्रवासाला सुरुवात केली. तो इटलीच्या सिसिलीतील पलेर्मोहून वडिलांसोबत लंडनला गेला. प्रवासादरम्यान दोघे इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्समार्गे ब्रिटनला पोहोचले. तीन महिन्यांच्या धावपळीनंतर हे दोघे २१ सप्टेंबर रोजी यूकेला आले. लंडन गाठल्यावर दोघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आजीला भेटता येणार आहे. रोमियो आणि त्याच्या वडिलांनी त्यांच्या प्रवासात ‘शरणार्थी एज्युकेशन अॅक्रॉस संघर्ष’ या स्वयंसेवी संस्थेला मदत करण्यासाठी ११.४ लाख रुपये म्हणजे १२ हजार पौंड जमा केले आहेत.