नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून या ठिकाणी तोडफोड केली आणि लूटमारही केली, ही घटना देशासाठी लाजिरवाणी होती, असे मत केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल व्यक्त केले.
या घटनेची माहीती देताना पटेल की, लाल किल्ल्यातील डझनभर मौल्यवान आणि पुरातन वास्तूंचे नुकसान या लोकांनी केले आहे. तसेच लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ठेवलेले दोन प्राचीन कलश हरवले आहेत. विशेष बाब म्हणजे लाल किल्ला बांधण्याच्या काळातील असल्याचे म्हटले जाते. या प्रकरणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी पुरातत्व संरक्षणासह विविध बाबींचा पोलिसांकडे अहवाल दाखल केला आहे.
पोलिसांनी आणि एएनआय या वृत्त एजन्सीने प्रजासत्ताक दिनाचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट दिसून आले आहे की, काही कथित शेतकरी लाल किल्ल्याच्या आवारात कसे घुसले आणि त्यांची तोडफोड कशी केली गेली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री पटेल यांनी लाल किल्ल्याला झालेल्या नुकसानीचा संपूर्ण अहवाल तयार केला जात असल्याची माहिती दिली. यामधील मुख्य नुकसान म्हणजे संपूर्ण गेट, संपूर्ण यंत्रणेची लाईट सिस्टम, पहिल्या मजल्यावर निर्माणाधीन इंटरप्रिटेशन सेंटर, सुमारे सात-आठ ब्लॉक पूर्णपणे तुटलेले आहेत तसेच तिकिट काउंटर आदिचे या आर्थिक नुकसानापेक्षा मोठे नुकसान म्हणजे मौल्यवान वस्तूंनी तोडफोड झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बघा व्हिडिओ
#WATCH: More amateur video clips emerge showing violence and vandalism at Delhi's Red Fort on 26th January. pic.twitter.com/BkRE7Qvl6t
— ANI (@ANI) January 28, 2021