नाशिक – गेल्या वर्षी नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिकमध्ये वाढतोच आहे. महिनानिहाय बाधितांची संख्या पाहिली तर गेल्या महिन्यात मार्चमध्ये आजवरचे सर्वाधिक म्हणजे ४९ हजार २५ जण कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १ लाख ६६ हजार ८२३ जणांनी कोरोना चाचणी करुन घेतली आहे. गेल्या वर्षभाराचा आलेख पाहता गेल्या महिन्यात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या आणि चाचण्यांचीही संख्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
बघा नाशिकच्या कोरोनाचा हा वाढता आलेख
(निळ्या रंंगात चाचण्यांची संख्या आणि तपकिरी रंगात बाधितांची संख्या)