नाशिक – राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनबाबत १२ पानांचे आदेश काढले असून त्यात अनेकांना संभ्रम आहे. नक्की काय बंद राहणार, कधी बंद राहणार, काय सुरू राहणार, शाळा बंद असल्या तरी बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार या आणि अशा अनेक प्रश्नांनी सध्या काहूर माजले आहे. यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, बंद ठेवावे की सुरू असा संभ्रम असेल तर बंद ठेवणेच योग्य आहे. आपल्याला जीव महत्त्वाचे आहेत. जीव वाचले तरच अनेक बाबी साध्य होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण आणि आदेश असे