कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपने डझनहून अधिक चित्रपट कलाकारांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक आकर्षक आणि रंगतदार बनत चालली आहे. त्यामुळे चुरस वाढली असून नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.
बंगाली चित्रपटसृष्टी मध्ये या निवडणूक संदर्भात दोन गटात विभागले गेले आहे. तृणमूलने उत्तरपारा मतदारसंघातून कंचन मल्लिक, बांकुरा येथे सयंतिका बॅनर्जी, कृष्णानगरमधून कौशिनी मुखर्जी, बॅरेकपूरमधून राज चक्रवर्ती, मेदिनीपुरात जुन मालिया आणि आसनसोल दक्षिण मधून सयोनी घोष यांना उमेदवारी दिली आहे. तर चंडिताल्ला येथील यश दासगुप्ता, खडगपूरचे हिरण चटर्जी, भवानीपूरचे रुद्रनील घोष, मयनागुरीचे कौशिक राय आणि बारानगरचे परर्न मित्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे.










