बंगळुरू – काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकल्याने येथे हिंसाचार झाला. हजारो तरुण रस्त्यावर उतरले. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. संतप्त जमावाने आमदारासह त्याच्या बहिणीच्या घरीही तोडफोड केली. पोलिसांनी जमाव नियंत्रणासाठी लाठीमार, अश्रूधूराचा वापर केला. यात ३ जणांचा मृत्यू झाला तर शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत.
वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या नवीन मूर्ती यास अटक करण्यात आली असून हिंसाचाररग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्टवरुन उसळलेल्या हिंसाचार थांबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. तसेच, या प्रकरणाची चौकशी जिल्हा दंडाधिकाऱ्यांद्वारे करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.