नवी दिल्ली – बँकांचा कामाचे निोजन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आगामी आठवडाभरात बँका तब्बल ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तातडीने योग्य नियोजन सर्वांना करावे लागणार आहे.
बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँक संघटनांची मुख्य संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं (यूएफबीयू) १५ व १६ मार्चला देशभरातील सर्व बँकांचा संप पुकारला आहे. परदेशी गुंतवणुकीची मंजुरी यालाही युनियनने विरोध केल आहे. तशी माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले आहे.
या बँक संघटना संपात सहभागी
यूएफबीयूमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज कॉन्फडरेशन ऑफ इंडिया या संघटना संपात सहभागी होतील.
खासगीकरणाला विरोध
एलआयसी आणि जनरल इन्शूरन्स कंपनीचं खासगीकरण, वीमा क्षेत्रात ७४ टक्के थेट गुंतवणुकीला संघटनांचा विरोध आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना दोन सार्वजनिक बँकांच्या खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. दोन्ही बँकांचे खासगीकरण केंद्राच्या निर्गुंतवणुकीच्या योजनेअंतर्गत केले जाईल, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं २०१९ मध्ये आयडीबीआय बँकेची एलआयसीला विक्री केली होती. याशिवाय गेल्या चार वर्षात १४ सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्यात आलं आहे.
बँका या दिवशी राहणार बंद
११ मार्च – महाशिवरात्र
१३ मार्च – दुसरा शनिवार
१४ मार्च – रविवार
१५ मार्च – संप
१६ मार्च – संप