नाशिक – सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आगामी फेस्टिव्हल सिझनसाठी गृह व वाहन कर्जाच्या व्याजदरात मोठी सूट दिली आहे. बँक ऑफ बडोदाच्यावतीने गृहकर्ज व वाहन कर्ज (हस्तांतरीत कर्ज) यावर ०.२५ टक्के सूट देण्यात आली आहे. याशिवाय प्रोसेसिंग शुल्क माफ करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये ही योजना सुरु असून ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक एच.टी. सोलंकी यांनी दिली आहे. बँक ऑफ बडोदाच्या देशभरात ९५०० शाखा, १३ हजार ४०० एटीएम, १२०० हून अधिक स्वयंसहायता इ लॉबी आहेत. तसेच, २१ देशांमध्ये १०० हून अधिक शाखा असलेली महत्वाचे स्थान असलेली आंतरराष्ट्रीय बँक आहे. दरम्यान, बँकेने दिलेल्या या सवलतीचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.
बेस्ट