नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांनी ऑनलाईन कामावर भर दिला असून नियोजित ठराविक दिवशी बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने यासंबंधी पत्रक जाहीर केले आहे. तसेच नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे बँकिंगची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आरबीआयने दिला आहे.
बँकेच्या शाखेत जाऊन काम करणार असला तर नोव्हेंबरमध्ये १४, १६ आणि ३० नोव्हेंबर रोजी बँका बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच शनिवार आणि रविवारी समाविष्ट करून नोव्हेंबरमध्ये सहा दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. १, ८, १५, २२ आणि २९ ऑक्टोबरला रविवार असल्याने नेहमीप्रमाणे बँका बंद राहणार आहेत. तसेच १४ आणि २८ ऑकटोबरला अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने त्यादिवशी बँका बंद राहणार आहेत. यात १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी निमित्त तर ३० नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने बँका असणार आहेत.