नवी दिल्ली – देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये बँक कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे बँका आज बंद आहेत. बँका उद्या शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) चालू राहणार असल्या तरी पुन्हा ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकांच्या कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन (एआयबीईए) ने बंद बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्व बँक कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. परिणामी आज सर्व राष्ट्रीयकृत बँका बंद आहेत. उद्या शुक्रवारी बँक व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा शनिवारी सुटी आहे. कारण बँका दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी बंद असतात. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुटी आहे. तर, सोमवारी गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहेत. सहाजिकच शुक्रवारी बँकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे.