मुंबई – वॉलमार्टच्या मालकीचे डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन पे हे डिसेंबर महिन्यातील सर्वाधिक लोकप्रिय युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) अॅप म्हणून पुढे आले आहे. फोन पे ने डिसेंबरमध्ये गुगल पे ला देखील मागे टाकले आहे.
फोन पे या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर डिसेंबरमध्ये जवळपास ९०२.०३ दशलक्ष ट्रान्झॅक्शन झाले असून त्याची एकूण किंमत १,८२,१२६.८८ कोटी रुपये आहे. याचा खुलासा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आफ इंडियाच्या अहवालात झाला आहे. डिसेंबरमध्ये गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर होते. या कालावधीत गुगल पे वरून ८५४ दशलक्ष ट्रान्झॅक्शन झाले. याची एकूण किंमत १,७६,१९९.३३ कोटी रुपये आहे.
विशेष म्हणजे देशात डिसेंबरमध्ये झालेल्या एकूण युपीएआय ट्रान्झॅक्शनमध्ये ७८ टक्के वाटा फोन पे आणि गुगल पे चा आहे. दोघांनीही डिसेंबरमध्ये २ हजार २३४ ट्रान्झॅक्शन केले. हे जवळपास ४,१६,१७६ कोटी रुपयांचे आहे. एनसीपीआयच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या डेटानूसारफोन पे च्या युपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत ३.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ८६४.४ दशलक्ष ट्रान्झॅक्शन आणि १,७५,४५३.८५ कोटी एवढा व्यवहार झाला होता.