मुंबई – प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ३५ कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीत नवे नाही. वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन व अभिनय केले आहे. मांजरेकर यांना बुधवारी (२६ ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन आला होता. यात ३५ कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने खंडणीखोराला अटक केली आहे. हा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचे समजले आहे. कोणत्या उद्देशाने त्याने मांजरेकर यांना धमकी दिली याचा तपस सध्या पोलीस करत आहेत.