पंजाब नॅशनल बँक वगळता उर्वरित पाच नॉन-बँक प्रीपेड पेमेंट प्रॉडक्ट (पीपीआय) देणारे युनिट आहेत. पीपीआयचा वापर मित्र, नातेवाईक इत्यादींकडे वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी केला जातो. आरबीआयने सोडेक्सो एसव्हीसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुथूट वाहन व मालमत्ता वित्त लिमिटेड, क्विक सिल्वर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, फोनपे प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पंजाब नॅशनल बँक यांना दंड ठोठावला आहे.
सोडेक्सोला २ कोटींचा दंड
सोडेक्सोला जास्तीत जास्त २ कोटींचा दंड, तर पीएनबी आणि क्विक सिल्वर सोल्युशन्सला प्रत्येकी १ कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनपेवर १.३९ कोटी आणि मुथूट वाहन व मालमत्ता फायनान्सवर ३४.५५ कोटी तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.