मुंबई – अभिनेता सुशांत सिंह आणि समीर शर्मा नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. आर्थिक हलाखी आणि फसवणूक या दोन कारणांवरुन भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने फेसबुक लाईव्ह करुन चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर पंख्याला लटकून आत्महत्य केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.






