सनफ्रान्सिस्को – लोकांचा चेहरा ओळखण्यासाठी त्यांचा बायोमेट्रीक डेटा चोरून आपल्या सर्व्हरवर स्टोअर करण्याच्या आरोपात फेसबुकला आता तब्बल ४ हजार ७८३ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. कंपनीने फेशियल रेकग्नीशन तंत्राद्वारे हा डेटा वापरून फोटो टॅग करण्याचे फिचर दिले होते.
गोपनियतेचे उल्लंघन मानत डिसेंबरपर्यंत १५ लाख ७१ हजार ६०८ युझर्सने खटले दाखल केले होते. सामूहिक सुनावणीदरम्यान भरपाईवर एकमत झाले. सॅनफ्रान्सिस्कोच्या न्यायालयाच्या न्यायाधिशांनी या सामंजस्यावर सहमती दिली.
फेसबुकला इलेनॉयसच्या बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन प्रायव्हसी कायद्याच्या उल्लंघनात दोषी मानले गेले आहे. न्यायाधीश डोनाटो यांच्या नुसार तीन लोकांनी सामंजस्यावर आक्षेप नोंदविला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्यामुळे सहमती दिली जात आहे.
गोपनियतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेसबुकविरुद्ध त्याच्या युझर्सचा हा सर्वांत मोठा विजय मानला जात आहे. दावा करणाऱ्या प्रत्येक युझरला आता ३४५ डॉलर म्हणजे २५ हजार ३९० रुपयांची भरपाई मिळणार आहे. फेसबुकच्या विरोधातील हे प्रकरण २०१५ पासून सुरू झाले. हळूहळू खटले वाढत गेले. २०२० पर्यंत ४ हजार ४७ कोटी डॉलरची भरपाई देण्यासाठी फेसबुकने सहमती दिली होती. मात्र न्यायाधिशांच्या हस्तक्षेपानंतर ही रक्कम वाढविण्यात आली.
चेहरा ओळखण्याचा पर्याय ऑफ
सर्व तक्रारकर्ते फेसबुकने केलेल्या बदलांवर समाधानी आहेत. या बदलांतर्गत फेसबुक आता चेहरा ओळखण्याचा पर्याय आफ ठेवणार आहे. विशेषतः ज्या युझर्सने आपल्या छायाचित्रांवर बायोमेट्रिक स्कॅनची परवानगी दिलेली नाही, त्यांच्या अकाऊंटला तर हा पर्याय अॉफच असणार आहे.
खटल्यात सामील युझर्सच्या परवानगीशिवाय स्टोअर केलेला डेटाही फेसबुक डिलीट करणार आहे. यातील जे लोक तीन वर्षांपासून फेसबुकवर एक्वीव्ह नाहीत, त्यांचाही डेटा फेसबुकला डिलीट करावा लागेल.