नवी दिल्ली – जगप्रसिद्ध फेसबुकने गेल्या सहा महिन्यात अँप्लिकेशनमध्ये नवनवीन बदल केले आहेत. तसेच इंस्टाग्राम, व्हॉटस्अँप सारख्या अँप्लिकेशचे डिझाईन तसेच त्यातील डार्क मोड यावर देखील काम केले आहे. मात्र, अद्याप फेसबुक कंपनीच्या कोणत्याही अँप्लिकेशनवर डार्क मोड देण्यात आला नाही. सध्या वैश्विक स्तरावर अँप्लिकेशनमध्ये डार्क मोड आणण्याच्या प्रयत्नात फेसबुक असल्याचे म्हटले जात आहे.
मॅकरुमर्सच्या अहवालानुसार, iOS वापरकर्त्यांना संबंधित अपडेट विषयी सूचना आल्या आहेत. त्यामुळे आयफोन वापरणाऱ्या फेसबुक ग्राहकांसाठी आता डार्क मोडचा पर्याय खुला करण्यात आला आहे. अहवालानुसार, अँड्रॉइड धारकांसाठी देखील डार्क मोडचा पर्याय सुरु करण्यात आला आहे.
अपडेट प्राप्त झाल्यावर संबंधित फिचरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. याआधी, व्हॉटस्अँपला आलेल्या डार्क मोडच्या फीचरला अनेकांनी पसंती दर्शवली होती. तसेच काही अंशी नव्या अपडेटला ट्रोल देखील करण्यात आले. परिमाणी, आता फेसबुकवर हे फिचर किती लोकप्रियता मिळवते याकडे लक्ष आहे.