नवी दिल्ली – बजेटमुळे अनेक आर्थिक बदल होतील. त्यामुळे बँकांसाठी काही महत्वाची कामे असल्यास पुढच्या महिन्यात बँकिंग व्यवहार नेमके कोणत्या तारखांना बंद आहे. हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
कोणत्या तारखा बँका बंद आहेत, हे आता जाणून घेऊ या…
आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपेल. सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारी मध्ये सादर करण्यात येईल. यावर्षी फेब्रुवारीत बँका किती दिवस असतील, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वर्षभर बँक सुट्टीच्या यादीनुसार बँका 40 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहतील. यात वीकएन्डचा समावेश आहे. रविवारी वगळता बँका महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.
१२ फेब्रुवारी – शुक्रवार – सोनम लोसार – (सिक्कीम )
१३ फेब्रुवारी – दुसरा शनिवार
१५ फेब्रुवारी – सोमवार -( मणिपूर )
१६ फेब्रुवारी – मंगळवार – वसंत पंचमी – (हरियाणा, ओरिसा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल )
१९ फेब्रुवारी – शुक्रवार – छत्रपती शिवाजी महाराज जयंती – (महाराष्ट्र )
२० फेब्रुवारी – शनिवार – (अरुणाचल आणि मिझोरम )
२६ फेब्रुवारी – शुक्रवार – हजरत अली जयंती – (उत्तर प्रदेश )
२७ फेब्रुवारी – चौथा शनिवार, गुरु रविदास जयंती – (चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब )
या सर्व तारखांना बँक शाखा बंद असल्या तरीही आपण इंटरनेट बँकिंगद्वारे बर्याच गोष्टी करू शकता. आरबीआयच्या म्हणण्यानुसार राज्यांमध्ये बँकांच्या सुट्या बदलू शकतात. म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात ठेवून बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे.