नाशिक – जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन व कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांच्या फेब्रुवारी २०२१ च्या निवृत्ती वेतनातून आयकर नियमानुसार कपात करणे आवश्यक आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ चे मासिक निवृत्तीवेतन विलंबाने म्हणजेच ८ मार्च २०२१ पर्यंत होणे अपेक्षित आहे. याची निवृत्तीवेतन धारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घेवून कोषागार कार्यालयास सहाकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ.राजेंद्र गाडेकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.