नवी दिल्ली – जगभरात कोरोना संक्रमण वाढते आहे. काही देशांमध्ये अजूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. परिणामी भारतात कोरोनाचे संक्रमण कमी झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. फुफ्फुसात विषाणूचा संसर्ग तीव्र असल्याने रुग्णांना त्रास होत आहे.
गंभीर संसर्गामध्ये, मानवी फुफ्फुसांचे तीव्र नुकसान होऊ शकते आणि कार्य करणे देखील थांबू शकते. फुफ्फुसे निकामी होण्यामागचे कारण शास्त्रज्ञांना सापडले आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील संशोधकांनी याबात संशोधन केले आहे.
यूके येथील किंग्ज कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्या लोकांच्या अवयवांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले असता बहुतेक प्रकरणांमध्ये परस्पर जोडलेल्या पेशींच्या अस्तित्वामुळे फुफ्फुस निरुपयोगी झाल्याचे आढळले. संबंधित संशोधनात ४१ रुग्णांचे फुफ्फुसे, हृदय, यकृत यांचे विश्लेषण केले. याविश्लेषणात फुफ्फुसे पूर्णपणे निकामी झाल्याचे आढळून आले आहे.
सुमारे ९० टक्के रुग्णांना कोरोनाची लागण झाली असता निमोनिया देखील झाला आहे असे निष्पन्न समोर आले आहे. ब्लड क्लॉटिंगच्या देखील समस्या यात आढळून आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘ईबोयोमेडिसिन’ जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या संशोधन अभ्यासामध्ये विषाणूचा विशिष्ट प्रवाह समोर आला आहे. या अभ्यासाच्या मदतीने हे स्पष्ट केले जाऊ शकते की थकवा आणि श्वास घेण्यासह या आजाराची लक्षणे अनेक रूग्णांमध्ये ‘लाँग कोविड’ म्हणून कित्येक महिने राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.