मुंबई – टोल नाक्यांवरील लांब रांगा आणि त्यातून वेळ वाचवण्यासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन टेक्नोलॉजी आहे.
फास्टॅग आपल्या सेव्हिंग अकाउंट किंवा डिजिटल वॉलेटला जोडता येते. फास्टॅगबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. फास्टॅग कोणत्या कंपनीचा घ्यावा, कुठे लावावा, कार विकल्यावर फास्टॅग ट्रान्सफर करता येतो का असे प्रश्नसुद्धा आहेत.
चला जाणून घेऊया फास्टॅगविषयी…
-
बाजारात एसबीआय, पेटीएम, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसी यासारख्या बँकांनी फास्टॅग उपलब्ध करून दिले आहेत.
-
कोणत्याही बँकेचा फास्टॅग घेतला तरी तो सोप्या पद्धतीनं रिचार्ज करता यायला हवा.
-
फास्टॅग खरेदी करताना वाहनांचे आरसीबुक, मालकाचा फोटो, ओळखपत्र, पत्ता, अशा कागदपत्रांची गरज आहे.
-
पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अॅड केले की, टोलनाक्यावर आपोआप फास्टॅगमधून पैसे कापले जातात.
-
फास्टॅग हा टोलनाक्यांवर, बँकांच्या वेबसाइट्सवर, वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाइटवरूनही खरेदी करता येतो.
-
गुगल प्ले स्टोअरवरूनही फास्टॅग डाउनलोड करता येतं.
-
फास्टॅग टोल प्लाझावरून खरेदी करता येतो, टोल प्लाझावर दोन्ही बाजूला फास्टॅगविक्रीचे पीओएस असतात. हे पेटीएम किंवा अन्य कंपन्यांचे असू शकतात.
-
माय फास्टॅग अॅप डाउनलोड करून माहिती भरल्यानंतर फास्टॅग अॅक्टिव्हेट करता येतो.
-
फास्टॅग कारच्या नंबरवर असतो. हा नंबरही युनिक असतो. टोल नाक्यावरू जाताना पुढील स्क्रीनवर तुमच्या वाहनांचा नंबर दिसतो.
-
वाहन विकल्यानंतर फास्टॅग नवीन मालकाला वापरता येत नाही, जर फास्टॅग त्या कारवरच ठेवला तर तुमच्याच अकाउंटमधून पैसे कापले जातात. त्यामुळे वाहन विकताना फास्टॅग काढणं हिताचं ठरेल.
-
फास्टॅग कधीही एक्स्पायर होत नाही.त्यामुळे त्यावरील बॅलेन्सही कधीच एक्स्पायर होत नाही.
-
वाहन अनेक दिवस टोलनाक्यावर गेलं नाही, तरी त्याचा फास्टॅगवर काहीही परिणाम होत नाही.