अक्षय कोठावदे,नाशिक
चांदवड येथील शेतकरी कुटुंबातील प्रतिक बाळासाहेब होनराव हा फार्मासिस्ट लघुपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवित आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रतिकला लघुपटात काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत प्रतिकने चार वर्षात तब्बल नऊ लघुपटात काम केले आहे.
प्रतिकला पहिली संधी १५ जुलै २०१५ मध्ये मिळाली आणि त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. तो अत्यंत कष्टाळू, होतकरू आणि अष्टपैलू असल्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीत लवकर पदार्पण केले आहे. त्याला लवकरच मराठी चित्रपटात संधी मिळेल, अशी खात्री त्याचे वडिल बाळासाहेब आणि आई सीमा होनराव यांनी व्यक्त केली आहे. चांदवडच्या एस एन. जे. बी. औषध निर्माण महाविद्यालय येथे बी. फार्मसीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. सध्या ते नाशकात विजय नगर येथे फार्मसिस्ट म्हणून काम करीत आहे. त्याला आनंद बच्छाव व अनिल भालेराव यांचे अभियनात अनमोल मार्गदर्शन लाभत आहे. त्याचा निर्भया हा लघुपट सर्वाधिक गाजला आहे. फार्मसिस्ट म्हणून काम करतानाही तो अभिनयाकडे लक्ष देत आहे.
कर्तृत्व, नेतृत्व आणि वकृत्व या तिन्ही गोष्टींचा मेळ म्हणजे प्रतिक. मूर्ती लहान पण कीर्ती महान या वाक्याप्रमाणे प्रतिक काम करतो आहे. अभिनयाच्या माध्यमातून तो स्वतःला सिद्ध करु पाहतो आहे.
– भूषण पिंगळे, प्रतिकचा मित्र
बालपणापासून प्रतिकच्या अंगी सर्व कलागुण असल्यानेच लघुपटात संधी मिळाली. लवकरच तो मराठी चित्रपटसृष्टीत दिसेल, अशी आम्हाला खात्री आहे.
– बाळासाहेब होनराव, प्रतिकचे वडिल