मुंबई – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज रुग्णालयातून घरी परतले. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. घरी परतल्यानंतर त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे सात दिवस मी ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांनी घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या त्यांचे आभार.