शिवकाशी – येथील सुमारे आठ लाख कामगार फटाक्यांच्या व्यवसायात असून यंदा त्यांच्या रोजीरोटीवर संकट आले आहे. शिवकाशी येथील फटाक्यांची वार्षिक उलाढाल सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मते, फटाका उद्योगाला यावर्षी 800 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल.
भारतातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण ही मोठी चिंतेची बाब म्हणून समोर येत आहे, देशाची फटाक्यांची राजधानी शिवकशीला आधीच याचा फटका जाणवत आहे. यानंतर कोविड -१९ साथीच्या रोगामुळे जवळजवळ दोन महिने सर्व व्यवहार बंद पडले. त्यामुळे मोठ्या विवाहसोहळा आणि सार्वजनिक सोहळ्यास रोखले गेले आणि मोठ्या बाजारपेठेचा उद्योग ठप्प झाला.
अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होताच शिवाकाशीच्या फटाके उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, परंतु यंदा कोरोना साथीच्या धोक्याने सर्व आशा मंदावल्या आहेत, कारण गणेश चतुर्थी, नवरात्रीसारखे उत्सव साधेपणाने साजरे झाले . सध्या सुरू असलेल्या दिवाळी सणाच्या हंगामात फटाका उद्योग पुनरुज्जीवन आशा दिसू लागल्या होत्या. मात्र आता दिवाळी व इतर सण-उत्सवाच्या वेळी मुख्यतः श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना व कोविड -१९ रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राजस्थान , दिल्ली, कर्नाटक, ओडिशा आणि सिक्कीम सह केंद्रशासित प्रदेशांमधून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, फटाका उद्योगाला केवळ यावर्षी 800 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल. याशिवाय 8 लाख कामगारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे.
तामिळनाडू फटाके आणि अॅमोरेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (तानामा) अध्यक्ष गणेशन पन्नरुजन म्हणाले की, यावर्षी सुमारे 800 कोटी रुपयांच्या तोटाचा अंदाज घेत आहोत. दोन महिन्यांचा लॉकडाउन आणि त्यानंतर ऑर्डरच्या संख्येत घट झाल्याने आम्हाला खूप त्रास झाला आहे. साथीचा रोग सुरू झाल्यानंतर शिवाकाशीतील फटका उत्पादकांचे म्हणणे आहे की, फटाक्यांच्या मागणीत 35 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे. सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन दरम्यान घरी बाहेर न जाण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ६० टक्के पेक्षा कमी कामगार या उत्पादनावर काम करीत आहे.
शिवकाशी येथील इंडियन फटाके उत्पादक संघटनेचे सरचिटणीस टी कन्नन म्हणाले की, यावर्षी गणेश चतुर्थी दरम्यान गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यांमधून मागणी न आल्याने विक्री घटली. विवाहसोहळा रद्द करण्यात आला, सणांवर बंदी घालण्यात आली, तसेच मनुष्यबळ कमी झाले. ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे.