प्लास्टिक सर्जरी : समज, गैरसमज आणि वस्तुस्थिती
आजच्या या आधुनिकतेच्या आणि धावपळीच्या विश्वात आपण सर्वच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतो आणि त्याचबरोबर विविध वैद्यकीय शाखेच्याबाबतीत अद्यावत माहिती ठेवतो. प्रचंड प्रमाणात प्रगती होऊनही “प्लास्टिक सर्जरी” या वैद्यकीय शाखेबद्दल सामान्य जनमाणसातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातिल काही व्यक्तींना सुद्धा मर्यादित माहिती असल्याचे आढळून येते. प्लास्टिक सर्जन नक्की काय करतात याबद्दल अनेकांच्या मनात बरेच समज अथवा गैरसमज दिसून येतात.
प्लास्टिक सर्जन नक्की काय करतात / प्लास्टिक सर्जरी म्हणजे तरी काय ?
“प्लास्टिक सर्जरी” ही एक अशी वैद्यकीय शाखा आहे जी एका कुठल्याही अवयव संस्थेपुरती मर्यादित नसून ती एखाद्या विशिष्ठ कार्यपद्धती ऐवजी तत्वांवर आधारित आहे. इतर वैद्यकीय शाखांप्रमाणे प्लास्टिक सर्जरी या शाखेला एका शारीरिक भागाद्वारे (जसे कान नाक घसा, डोळे, हृदय) किंवा अवयव प्रणालीद्वारे (जसे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजि , युरॉलॉजी) किंवा रुग्णांची वयोमर्यादा अथवा लिंग (जसे बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, गेरीऍट्रिक्स) यांद्वारे परिभाषित करता येणे शक्य नाही. प्लास्टिक सर्जन रुग्णांच्या डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत चे प्रश्न सोडवतात .
साध्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे : शरीराचा कुठलाही भाग आपल्याच शरीराचा दुसरा घटक किंवा (गरज पडल्यास आणि शक्य असल्यास) कृत्रिम घटक वापरून पूर्ववत करणे (दिसण्यासाठी किंवा दैनंदिन काम करण्यासाठी) म्हणजे प्लास्टिक सर्जरी होय. अर्थत: “प्लास्टिक” या शब्दाशी ह्या वैद्यकीय शाखेचा काही संबंध नाही. ग्रीक भाषेमधील “Plastikos” (इंग्लिश : To Mould) या शब्दापासून हे नाव पडले आहे. वास्तवता: या शाखेचा उगम भारतातच झाला आहे आणि सुश्रुत संहितेमध्ये तशी नोंद देखील आहे.
प्लास्टिक सर्जरी हा शब्द आपल्या कानी पडताच आपल्याला एकच गोष्ट डोळ्यासमोर येते .. आणि ती म्हणजे काहीतरी करून एखाद्या व्यक्तीचे मूळ रूप बदलवून त्याला नवीन रूप अथवा आकार देणे.
पुनर्रचना (Reconstruction) हे प्लास्टिक सर्जनचे मूळ काम असून त्याची दखल घेतली जात नाही. भारतामध्ये पुष्कळ वेळा रुग्णाची सगळी ओपरेशन्स करून झाल्यानंतरही “माझी प्लास्टिक सर्जरी कधी होणार” अश्या प्रश्नांना सामोरे जावे लागते ! आम्हा प्लास्टिक सर्जन्स साठी प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त कॉस्मेटिक सर्जरी पर्यंत मर्यादित नसून एक अष्टपैलू शाखा आहे ज्या मध्ये आमच्या दिनचर्येत पुनर्रचना (Reconstructive Work) शस्त्रक्रिया हा एक मोठा भाग आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
या शाखेचा विस्तार (Spectrum) खूप मोठा आहे. विविध आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्लास्टिक सर्जन हा पारंगत असतो. त्यामध्ये :
- चेहऱ्याचे व्यंग ( जन्मजात किंवा इतर कुठल्याही कारणामुळे झालेले) नीट करणे
- कॉस्मेटिक सर्जरी ,
- हाताच्या शस्त्रक्रिया , (Tendon , nerve , vessel injuries )
- पेरिफेरल नर्व्ह सर्जरी,
- भाजलेल्या रुग्णांना बरे करणे,
- भाजल्यानंतर जखडलेली सांधे , मान , हात , बगल यांना पुनर्वत करणे ,
- जननेंद्रियांची पुनर्बांधणी ,
- ऑक्युलोप्लास्टिक सर्जरी ,
- बेडसोअर रिकंस्ट्रक्शन,
- मार लागल्यानंतरची पायांची पुनर्बांधणी,
- हाताच्या व चेहऱ्याच्या हाडांच्या फ्रॅक्चर्सची ट्रीटमेंट,
- रक्तवाहिन्यांची सर्जरी, ( Varicose veins, Peripheral bypass surgeries )
- लिम्फयाटिक सर्जरी,
- कर्करोगानंतर अवयवांची पुनर्बांधणी ,
- शरीरावर झालेल्या गाठीचे अचूक निदान आणि त्यांचे उपचार करणं
- स्वरूप आणि कार्यक्षमता पूर्ववत आणण्याच्या अश्या अनेक शस्त्रक्रिया मोडतात.
प्लास्टिक सर्जरी विषयी आपल्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. दूरसंचार (Television), चित्रपट, अनेक मासिके , आणि इतर प्रसार माध्यमांकडून पसरविल्या जात असलेल्या चुकीच्या माहितीमुळे आणि खऱ्या माहितीअभावी जनतेची दिशाभूल होत आहे. आणि त्याचबरोबर प्लास्टिक सर्जरी बद्दल असणारी वास्तविकता, मर्यादा आणि लोकांच्या मनात असणारी अवास्तविक अपेक्षा यांमधे असलेले असंतुलन हे रुग्णांच्या निराशेस कारणीभूत ठरते.
१. प्लास्टिक सर्जरी मध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो त्यामुळे त्याला “प्लास्टिक सर्जरी” असे संबोधतात.
तथ्य: “प्लास्टिक” हा शब्द ग्रीक भाषेमधील “प्लास्टिकोस” कडून आला आहे (Plastikos : To Mould म्हणजे आकार देणे). या शब्दामुळे “प्लास्टिक सर्जरी ” ही संज्ञा प्रचलित झाली. जरी सिलिकॉन किंवा इतर अनेक प्रकारचे implants प्लास्टिक सर्जरी मध्ये वापरले जातात तरी त्वचा किंवा अवयवांच्या पुनर्बांधणीच्या कार्यपद्धतीमुळेच “प्लास्टिक सर्जरी ” हे नाव प्रचलित झाले.
२. प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर कुठलेही डाग अथवा व्रण राहत नाहीत.
तथ्य: कुठलीही शस्त्रक्रिया असो (प्लास्टिक सर्जरी त्याला वाद नाही), व्रण हे राहतातच! कमीत कमी व्रण राहतील या अनुषंगानेच त्वचेवर धोरणात्मक कट्स घेणे , त्वचेची नाजूक पणे हाताळणी करणे या गोष्टींचे प्रशिक्षण प्लास्टिक सर्जन्सना दिले जाते. उपरोक्त गोष्टी आणि सूक्ष्म धागे आणि सूक्ष्मदर्शिका किंवा दुर्बिण (Operating Magnifying Loupes) यांच्या वापरामुळे व्रणाचे (प्लास्टिक सर्जनने शस्त्रक्रिया केल्यास ) दिसणे बहुतांशी कमी असते. शस्त्रक्रियेनंतर प्लास्टिक सर्जनने सांगितल्याप्रमाणे योग्य ती काळजी घेतल्यास व्रण नाहीसा होण्यास अजून मदत होते. त्याच प्रमाणे अनुवांशिक व वैयक्तिक आरोग्य घटकांमुळे सुद्धा त्वचेच्या सावळण्यावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो.
३. प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे एकच गोष्ट आहे; आपले सौन्दर्य वाढविण्यासाठीच फक्त प्लास्टिक सर्जरी असते.
तथ्य: जरी कॉस्मेटिक (किंवा एस्थेटिक) सर्जरी हि प्लास्टिक सर्जरीची प्रचलित आणि सगळ्यांना माहित असणारी शाखा असली , तरीही बहुतांशी केल्या जाणाऱ्या प्लास्टिक सर्जरीज ह्या कॉस्मेटिक सर्जरी नसतात. वर नमूद केल्याप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरी व्यतिरिक्त हॅन्ड सर्जरी, मायक्रोव्हॅस्कुलर सर्जरी , नर्व्ह सर्जरी, मॅक्सिलोफिशिअल सर्जरी आणि इतर अनेक शाखांमध्ये प्लास्टिक सर्जरी विभागली गेली आहे. प्लास्टिक सर्जरी मध्ये प्रथमतः एखाद्या भागाची कार्यक्षमता वाढविण्यास प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर त्याच्या दिसण्यावर भर दिला जातो.
४. प्लास्टिक सर्जरीज प्रचंड महागड्या असतात आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत.
तथ्य: बहुतांशी प्लास्टिक सर्जरीज ह्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतात आणि या उलट प्लास्टिक सर्जरी करावी लागणारे बहुतांशी लोक सर्वसामान्य असतात. प्लास्टिक सर्जरी या शब्दाशी निगडित असलेले (Glamour) आकर्षणामुळे आपल्याला या सर्जरीज अतिशय महागड्या वाटतात.
५. प्लास्टिक सर्जरीचा वापर करून संपूर्ण चेहरा बदलता येतो.
तथ्य: हे विधान काही अंशी खरे मानले जाऊ शकते. मस्तिष्क मृत (ब्रेन डेड) झालेल्या रुग्णाचा चेहरा पूर्णपणे काढून तो व्यंग असलेल्या चेहऱ्याच्या ठिकाणी रोपण करणे आता काही देशांमध्ये शक्य झाले आहे. अश्याच पद्धतीची शस्त्रक्रिया अपघातामध्ये पूर्णपणे हात गेल्यासही करता येते. याला Cadaveric Face (किंवा Hand) Transplant असे म्हणतात. तथापि ह्या शस्त्रक्रियेनंतर दीर्घ काळासाठी प्रतिकारशक्ती कमी ठेवण्यासाठी विविध औषधे द्यावी लागतात. आणि त्यांचे दीर्घकालीन परिणामांची तपासणी होणेही आवश्यक आहे. हातांसाठी अश्या शस्त्रक्रिया आता भारतात होऊ लागल्या आहेत आणि येत्या काही वर्षात चेहर्यासाठीही त्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्याने केस, नाक, डोळे, भुवया, हनुवटी, ओठ आणि काही इतर बाबींमध्ये विशिष्ठ सकारात्मक सुधारणा केल्या जाऊ शकतात.
६. प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीज अतिशय धोकादायक असतात.
तथ्य: इतर कुठल्याही शस्त्रक्रीयांप्रमाणेच किंवा तितकीच जोखीम ही प्लास्टिक सर्जरी करतानाही असतेच. त्यात अतिरिक्त जोखीम नाही.
७. फक्त काही विशिष्ठ केंद्रे आणि मोठ्या रुग्णालयांमध्येच प्लास्टिक सर्जरी शक्य आहे.
तथ्य: कॉर्पोरेट रुग्णालयांशिवाय अनेक सरकारी रुग्णालये तसेच इतर अद्ययावत ऑपरेशन थिएटर असणार्या हॉस्पिटल्स मध्ये प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया शक्य आहेत.
८. चेहर्यावर अथवा शरीराच्या इतर ठिकाणी झालेल्या जखमांसाठी कुणाला भेटले पाहिजे ?
तथ्य: खरंतर जिथे आपल्याला सौंदर्य महत्वाचे तिथे म्हणजे प्रामुख्याने चेहर्यावर आणि जिथे कार्यक्षमता महत्वाची वाटते तिथे म्हणजे हातावर जर कुठलीही जखम झाली असेल तर आपण प्लास्टिक सर्जनची आवर्जून मदत घेतली पाहिजे. जखमांना फक्त टाके घालणे महत्वाचे नाही तर त्यामधील सगळी घाण/माती ही दुर्बिणीखाली बघून साफ करणे गरजेचे असते. त्याचबरोबर हातामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी असतात जसे बोटांच्या सांध्यांची हालचाल करणारे स्नायुबंध (टेंडॉन) किंवा स्पशर्ज्ञान मिळणार्या शिरा म्हणजे नर्व्हस आणि अतिशय महत्वाचे म्हणजे बोटांना पुरवठा करणार्या रक्तवाहिन्या. या सगळ्या गोष्टींची सूक्ष्म अवजारांची हाताळणी आणि इजा झाल्यास त्यांना पूवर्वत करण्याचे काम फक्त एक प्लास्टिक सजर्नच करू शकतो. जखम झाल्यानंतर तिथे कमीत कमी व्रण राहिल याची काळजी प्लास्टिक सर्जन घेतात.
आकार हॉस्पिटल – डॉ. किरण नेरकर – ४ था मजला , साई स्क्वेअर कॉम्प्लेक्स, तूपसाखरे लॉन्स च्या अलीकडे, मुंबई नाका, नाशिक
अपॉइंटमेंट साठी : ९८९०८४४४०० ( सोमवार ते शिनवार )
वेळ : सकाळी १० ते दुपारी १, संध्याकाळी ५.३० ते ७.३०
वेबसाईट: https://www.aakaraesthetics.com/
गुगल मॅप्सवर शोधण्यासाठी क्लिक करा:m http://tiny.cc/Aakar
Facebook Page – https://www.facebook.com/cosmeticsurgerynashik
Sponsored Article